Published On : Tue, Jun 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त पसंती, सर्वेक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीने कंबर कसली आहे. मात्र दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीतल्या मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे, तर देवेंद्र फडणवीसांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर बसलेले पाहायचे आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Gold Rate
27 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,200 /-
Gold 22 KT ₹ 1,13,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा मागे पडलीय का? तसेच नरेंद्र-देवेंद्र ऐवजी मोदी-शिंदे हे बदलेले समीकरण आवडलं का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी बावनकुळे यांना विचारला. यावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहे. या सरकारचे प्रमुख आहेत. तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने ही जाहिरात देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील जनतेने दोनदा देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः निवडून दिले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी गले काम केले होते. मुळात कोण मोठे , कोण छोटे हे शिवसेना – भाजप युतीसाठी महत्त्वाचे नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement