Published On : Mon, Sep 9th, 2019

मूलभूत सुविधांसाठी पूर्व नागपूरकरांची झुंज

Advertisement

– सरोदे नगर प्रभाग २६, वाठोडा येथे दुरावस्ता ,नागरिकांच्या तक्रारी, युकाँचे आंदोलन

नागपूर : पूर्व नागपूर येथे स्मार्ट सिटीची तयार होत आहे. या ठिकाणी मोठे प्रकल्प आकार घेत आहेत. शहराच्या आकर्षनाचे केंद्र होऊ पाहात असलेल्या पूर्व नागपूरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटणार नसेल तर, नागरिकांनी करावे तरी काय आणि सांगावे तरी कुठे? अशा परिस्थतीत नागरिकांनी आंदोलनाची मशाल हाती घेतली असून, झोपी गेलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्याकरिता पूर्व नागपूर युवक काँग्रेसने रविवारी (८ सप्टेबर)आंदोलन केले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरोदे नगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे साम्राज पूर्व नागपूरच्या विकासाला हिणवत आहे. शहरात सर्वत्र विकासाचे गुणगान केले जात आहे. स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवल्या जात आहे. शहरातील प्रमुख भाग सोडल्यास, प्रभागातील समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शहर विकासरुपी नवा आकार घेत असला तरी शहरातील जनता मात्र मुलभूत सुविधांसाठी झुंज देत आहे. नागरिकांच्या समस्या ऐवढ्या की आता चक्क लोकप्रतिनिधीही तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची चक्क चाळण झाली आहे. जीवघेणे खड्डे अपघाताचे कारण बणत आहे.

याबाबत सततची ओरड असतानाही महापालिकेला नाररिकांच्या तक्रारीला ओ देत नाहीय. अशातच, प्रभागातील हाल काय असतील याची प्रचिती येते. प्रमुख रस्त्यांच्या समस्याच महापालिका ऐकायला तयार नसेल तर प्रभागातील रस्त्यांचा प्रश्नच येत नाही. पूर्व नागपूर येथे नागरिकांच्या अनेकानेक समस्या आहेत. सरोदे नगर, वाठोडा येथील नागरिकांनी आता शासन प्रशासनाकडे तक्रारीकरून हात टेकले आहे. कुठल्याही परिस्थितीत कामे होत नसल्याचे बघता आता थेट जनतेनेचे आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.

उपरोक्त परिसरात दुर्घटना नित्याची बाब झाली आहे. महानगरपालीका अखत्यारित येत असलेल्या या प्रभागात एकही रस्ताच नाही, हे तेवढेच नवल. परंतु, हे नवल येथील लोकप्रतिनिधींच्या नावलौकीकास कुठेही भूषावह नाही. येथील नगरसेवक जनतेची चक्क दिशाभूल करत आहे, असा आरोप आता जनता करत आहे. प्रभाग २६ मध्ये घाणीचे साम्राज्य, डुकरांच्या हैदोस आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

या विरोधात जनतेमध्ये रोष व्याप्त असून युवक काँग्रेसने जनतेची साथ देत प्रशासनाविरोधात हल्लाबोल केला आहे. युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात पूर्व नागपूर अध्यक्ष अक्षय घाटोळे, आकाश गुजर, राहुल सिरिया आदिंनी या विरोधात आंदोलन केले. यावेळी सत्ताधाºयांविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.

यावेळी मुज्जु शेख, फझलुर रहमान कुरेशी, राजू वारजूरकर, दिलीप गुप्ता, नागेश धोपटे, दिनेश सातपुते, दुर्गेश हिंगणेकर, नितीन जुमळे, अझहर शेख, अखिलेश राजन, तुषार मदने, ऋषभ धुळे, अभिजीत कोहर, आशिष दाते, मन मेश्राम, अभिषेक बडवाईक, निखिल बालकोटे, विक्की नटीये, प्रशांत तुमसरे, कुणाल शाहू, योगेश गायधने,नकील अहमद, फरदिन खान, इंद्रजित घुटके संकेत जमगाडे यासह परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.

Advertisement
Advertisement