Published On : Tue, May 25th, 2021

पूर्व नागपूर भा.ज.प. युवा मोर्चा तर्फे रुग्णालयात भोजन वाटप

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस येत्या 27 में रोजी असून त्या अनुषंगाने पूर्व नागपुरात सेवा सप्ताह कार्यक्रम सुरु आहे. त्याच साखळीत भा.ज.यू.मो. च्या वतीने मेडिकल, मेयो व डागा रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईकांना व गरजूंना भोजन वाटप करण्यात येत आहे. आमदार कृष्णा खोपडे यांचे मार्गदर्शनात व युवा अध्यक्ष सन्नी राऊत यांचे नेतृत्वात हा कार्यक्रम सतत सुरु आहे.

युवा अध्यक्ष सन्नी राऊत यांनी सांगितले की, युवा मोर्चाच्या वतीने कोविड रुग्णांच्या अडचणी कशाप्रकारे दूर करता येईल याकरीता आमचे युवा कार्यकर्ते सतत प्रयत्नशील आहे. आतापर्यंत प्लाझ्मा दान, रक्तदान इतकेच नव्हे तर अनेक गरीब कोरोना रुग्णांचे वाढीव बिल सुद्धा कमी करून देण्याचे काम आम्ही केले. येत्या काळात देखील सतत आमचे सेवाकार्य सुरु राहील.

यावेळी सन्नी राऊत, सचिन करारे, आशिष मेहर, पिंटू पटेल, मंगेश धार्मिक, गुड्डू पांडे, गोविंदा काटेकर, प्रवीण ठाकूर, हर्षल मलमकर, विकास रहांगडाले, हर्शल वाडेकर, तुषार ठाकरे, राहुल भगत, राहुल पराते, शुभम पठाडे, राहुल यादव, विवेक ठवकर, शैलेश नेताम, अखिलेश साकोरे, शुभम गुप्ता, निलेश लारोकर व अनेक युवा कार्यकर्ते सतत प्रयत्नशील आहे.