Published On : Thu, Jan 3rd, 2019

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Advertisement

मा.महापौर व मा.उपमहापौर व्दारा विनम्र अभिवादन

अडाणीपणाचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, वार्डाच्या नगरसेविका सौ. हर्षला साबळे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

या प्रसंगी सर्वश्री. ए.डी.पाटील, एन.डी.मेश्राम, एस.एम.शेंडे, बी.डी.शेंडे, एस.जी. गजभिये, व्ही.पी.गोडबोले, अभय डोंगरे, विजय कांबळे, पी.एम.चव्हाण आदी उपस्थित होते.

तसेच म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महापौर कक्षात महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

या प्रसंगी निगम सचीव हरिष दुबे, महापौरांचे निजी सहा.संजय मेंडुले, सहा.जनसंपर्क ‍अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, दिलीप तांदळे, नरेश खरे, अनुप सवाईतुल, रवी किंदर्ले, मनोज मिश्रा, ताराबाई मोहाडीकर, लता पाटणे, निलेश भांडारकर, शुध्दोधन घुटके आदी उपस्थित होते.