Published On : Tue, Sep 10th, 2019

पावसाचा अतिवृष्टीमुळे घर पडल्याने धरमनगर पिपरी येथील रहिवासी बावणे कुंटुबिय बेघर

Advertisement

पारशिवनी :– पाराशिवनी तालुक्यातिल कन्हान नगर पारिषद चे धरमनगर पिपरी प्रभागा तिल येथील रहिवासी लखन बावणे सौ चंदा बावणे, तसेच यांना 4 आपत्य मुली आहे कसेबसे तरी मजुरीने कामधंदा करूण कुंटुबियांचा उदरनिर्वाह सुरू होता त्यांचे एकमेव राहण्याचे घर होते पण मागील दिवसांपासून पावसाने अतिरेक केल्याने त्यांचा कुंटुबियांना बेघर व्हावे लागले कारण की त्यांचे राहण्याचे एकमेव स्थान म्हणजे घर हे मध्यरात्री कोसळले पण कुंटुबिय वेळेच जागी झाल्याने सुदैवाने जिवहानी झाली नाही पण त्यामधे असलेले जिवनाश्यक वस्तु मातीचा मलब्यात दबले त्यामुळे त्यांचा राहत्या घरासहीत अन्न ,वस्त्र, निवारा हे संपूर्ण उद्धवस्त झाले आज हे कुंटुबिय बेघर झाले आहे

आता यांना राहण्यासाठी व दोन वेळेचे जेवन व कपडे सुद्धा नाही संपूर्ण कुंटुबिय आज जिवन मरणाचा यातना भोगत असून संपूर्ण बावणे कुंटुबिय उघड्यावर जिवनव्यापन करीत आहे जिल्हातील व तालुक्यातील शासन प्रशासनावर विराजमान अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की सदर कन्हान चे बावणे कुंटुबियांची व घराची पाहणी करूण तात्काळ त्याना आर्थिक सहयोग संबंधित विभागाने करावे हि मागणी ह्या वेळेस युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार तसेच गोपाल कुंभरे, दिलीप डोंगरे, सुभाष मडावी, ओमकार निमजे, अशोक डडुरे, विवेक खोब्रागडे, प्रकाश भोपे, राजकुमार भरणे, तसेच महिला गण जया खोब्रागडे, सुनंदा कुंभरे, जयश्री डोंगरे, ताराबाई भोपे इत्यादी महिला व नागरीकांनी पिपरी गाववासीयांनी केली.

– कमल यादव, तालुका प्रातिनिधी