Published On : Sat, Mar 2nd, 2019

सीमेंट रस्ता बांधकामामुळे विविध ठिकाणची वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर: शहरात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध भागातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यासंबंधी आदेश नुकतेच मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पारित केले.

सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये रस्ता क्रमांक ३४ गोकुळपेठ बाजार, कॉफी हाउस चौक ते रामनगर टेकडी रोड दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत या रस्त्यावरील उजव्या बाजूची वाहतूक बंद राहील. या मार्गावरील वाहतूक डाव्‍या बाजुने दुतर्फा केली जाईल.

याशिवाय रस्ता क्रमांक ३२ दरम्यानचा बोरगाव चौक ते अवस्थी नगर ते सादीकाबाद टी-पॉईंट दरम्यान रस्ता सीमेंट काँक्रीट करण्याचे प्रस्तावित असल्याने या मार्गावरील उजवीकडील वाहतूक ३० एप्रिलपर्यंत बंद राहिल. सदर मार्गावरील वाहतून डाव्या बाजुने दुतर्फा सुरू राहील.

रस्ता क्रमांक ३८ दरम्यान नेल्को सोसायटी ते रिंग रोड भांगे लॉनदरम्यान रस्ता सीमेंट काँक्रीट बांधकामामुळे ३० मार्चपर्यंत या मार्गावरील उजवीकडील वाहतूक बंद राहील. सदर मार्गावरील वाहतून डाव्या बाजुने दुतर्फा सुरू राहील, यासंबंधीही आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.