Published On : Mon, Mar 30th, 2020

कर्मचारी कटोतीमुळे शासकीय कार्यालये पडताहेत ओस

कामठी :-कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहेत .लोकांच्या गर्दीतून कोरोनाचे संक्रमण होत असल्याची खात्री पटल्यावर सरकारने दळणवळण बंद केले आहे. धारा 144 लागू केली आहे यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल असा आशावाद सरकारचा आहे .

या सोबतच शासकिय कार्यालयातील मनुष्यबळ पन्नास टक्क्यांहून पंचवीस टक्के व आतातर पाच टक्के शासकीय कार्यालयातील मनुष्यबळ करण्यात आले आहे त्यामुळे कामठी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभाग वगळता इतर विभागोय कार्यालये 5 टक्के कर्मचारी उपस्थितो च्या नियमामुळे ओस पडलेले दिसताहेत.

कामठी तालुक्यातील बहुतांश शासकिय कार्यालयात स्मशान शांतता निर्माण झाली आहे .बहुतांश शासकिय कार्यलयाच्या प्रशासन विभागातील विभाग प्रमुख उपस्थित राहत असून बोटावर मोजणारेच कर्मचारी उपस्थित दिसतात .तर या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावणे कोरोनाची किती ताकद आहे याची जाणीव होत आहे ,बस खाजगीतील प्रवासी वाहने बंद झाले आहेत , हॉटेल,पांनठेले, जनरल दुकाने बंद आहेत .या सर्व स्थितीत कोरोना विषाणू ची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे

संदीप कांबळे कामठी