Published On : Mon, May 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात क्रिकेट जुगारामुळे कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या,शोकाकुळ आईनेसुद्धा संपविले जीवन !

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत आंबेडकर चौक येथील चाप्रू लोक येथे राहणाऱ्या रितेश वाघवानी या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून विवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, रितेशच्या मृत्यूने दुखी झालेल्या त्यांच्या आईनेही सोमवारी सकाळी विष प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपविली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट जुगारात गुंतल्यामुळे रितेश कर्जबाजारी झाला होता. शेवटी याला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. मात्र त्याच्या या निर्णयामुळे रितेशच्या आईला मोठा धक्का बसला.

Gold Rate
22 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,500 /-
Gold 22 KT ₹ 1,15,800 /-
Silver/Kg ₹ 1,63,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जुगाराच्या व्यसनामुळे त्याला बळी पडणाऱ्या व्यक्तीचे आणि त्याच्या प्रियजनांचे किती नुकसान होते हे अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement