Published On : Fri, Apr 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कन्हान नदीतील पाण्याच्या उपलब्धतेत घट झाल्यामुळे उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपूरमध्ये पाणीपुरवठा कमी होणार

Advertisement

नागपूर: कन्हान नदीत पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे, 18, 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपूर येथील काही भागात पाणीपुरवठा अपेक्षेपेक्षा कमी होणार आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात, लघुसिंचन विभाग (जलसंपदा विभाग) कन्हान नदीत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करतो. हा विसर्ग 19.4 किमी चेनजवरील राईट बँक कॅनॉल (RBC) वरील इस्केप गेटमधून होतो आणि हे पाणी ड्रेनेज चॅनेलद्वारे कन्हान नदीत मिसळते. त्यामुळे कन्हान वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) च्या इन्टेक वेल्समध्ये पाण्याची उपलब्धता वाढते.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावर्षी, 19 मार्च 2025 पासून हा अतिरिक्त विसर्ग सुरू झाला होता आणि तो संपूर्ण उन्हाळा चालू राहण्याची अपेक्षा होती. परंतु, कॅनॉलच्या सुमारे 10 किमी चेनजवर सिव्हिल ब्रेक झाल्यामुळे, नवेगाव-खैरी जलाशयातील RBC चे गेट WRD ने बंद करावे लागले.

WRD कडून कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्खनन व डायव्हर्शन चॅनलचे काम पूर्ण झाल्यानंतर 19 एप्रिल 2025 च्या संध्याकाळपर्यंत RBC चे गेट पुन्हा उघडले जातील, अशी शक्यता आहे.

तोपर्यंत, कन्हान WTP ला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी मिळत असल्याने, सुमारे 10 ते 15 MLD नी पाणी उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे पुढील झोन व कमांड एरियामध्ये पाणीपुरवठा कमी होणार आहे:

लकडगंज झोन: भारतवाडी, कळमणा, सुभान नगर, मिनीमाता नगर, भांडेवाडी, लकडगंज I & II, लकडगंज, बाबुलबन, पारडी I & II

सतरंजीपुरा झोन: शांती नगर, वांजरी, कळमणा

नेहरू नगर झोन: नंदनवन (एक्झिस्टिंग), नंदनवन, ताजबाग, खरबी, सक्करदरा, वाठोडा, अमृत

OCW सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा आणि या तात्पुरत्या परिस्थितीत सहकार्य करावे. जसेच इन्टेक वेल्सला आवश्यक पाणी उपलब्ध होईल, तसतसा पाणीपुरवठा पुन्हा नियमित केला जाईल.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Advertisement
Advertisement