Advertisement
नागपूर: शहरातील हुडकेश्वर परिसरातील पिपळा फाटा येथे निमजे सावजी रेस्टॉरंट मध्ये नागपूर पोलीस विभगाच्या दोन पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत राडा घातला.आज दुपारी ४ वाजता जेवण देण्यावरून वाद झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला बेदम मारहाण केली.
या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे
माहितीनुसार,एचसी रामचंद्र रोहणकर आणि एचसी भूषण अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीसांना चांगलाच चोप दिला.तसेच त्यांचे कपडेही फाडत त्यांची परिसरातून हकालपट्टी केली.
या घटनेची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून प्रकरणाचा तापस सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.