Published On : Tue, Jan 8th, 2019

ड्रग्स माफिया आबू खानला फिल्मीस्टाईल अटक

Advertisement

नागपूर : गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोवा, मुंबईसह मध्य भारतातील अनेक ड्रगमाफियांचा दुवा म्हणून आबू खान ओळखला जातो. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षांपासून आबू ड्रग्स तस्करीत गुंतला आहे. विविध प्रकारच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीतील महत्त्वाचा सदस्य म्हणून आबूची सर्वत्र ओळख आहे. महिन्याला लाखोंची खेप इकडून तिकडे करणाऱ्या आबूकडे कोट्यवधींची मालमत्ता अन् अनेक वाहने आहेत.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याच्यासाठी केवळ तस्करी करणारेच नव्हे तर अनेक गुन्हेगारी टोळ्यातील गुंडही काम करतात. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अमिर खान आतिक खान (मुंबई), मोहम्मद वकार ऊर्फ गौस मोहम्मद अनिस, जावेद ऊर्फ बच्चा अत्ताऊल्ला खान आणि अर्शद अहमद अशफाक अहमद या चौघांना चार लाखांच्या एमडी पावडर (ड्रग्स)सह अटक केली होती.

ते सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने आबू राहत असलेल्या मोठा ताजबाग वस्तीत छापा घातला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सिनेस्टाईल ताब्यात घेतले.

Advertisement
Advertisement