Published On : Fri, Jan 20th, 2023

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, मनपा, नागपूर

Advertisement

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत नागपूर शहरात खाजगी स्तरावरील खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांकडुन क्षयरुग्णांची मोठया प्रमाणात तपासणी होवुन क्षयरुग्ण औषधोपचारावर आहेत. या सर्व माहितीने राज्य स्तरावरुन दि. 12/01/2023 रोजी हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ, नागपूर येथे खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांकरीता महानगरपालिका आरोग्य विभागाच्या मार्फत शहर क्षयरोग कार्यालय, मनपा नागपूर यांच्या समन्वयाने Indian Medical Association, Nagpur & IMA-AMS-Maharashtra State (Academy of Medical Specialities) & Vidarbha Chest Association

या सर्व असोसिएशनच्या मार्फत यांच्यासाठी निरंतर वैद्यकिय प्रशिक्षण कार्यशाळा (Continue Medical Education) चे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाकरीता Johnson & Johnson कंपनीने सुध्दा आपला सहभाग दिलेला आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत नागपूर शहरातील सर्व खाजगी छातीरोग तज्ञ डॉक्टर उपस्थित होते व त्यांच्याच माध्यमातुन क्षयरोगाचे निदानाच्या पध्दती वर माहिती सादर करण्यात आली, उपचाराच्या पध्दतीमध्ये झालेले नवनविन बदल व निर्माण झालेल्या औषधी यावर चर्चा करण्यात आली, तसेच क्षयरोग होवु नये म्हणुन शासनाने तयार केलेल्या प्रणालीबाबतच्या विषयावर सुध्दा चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर शहरामध्ये चालु असलेलया शासकीय व खाजगी स्तरावरील निदान व औषधोपचाराची सांगड कशी घालण्यात येत आहे याबाबत सुध्दा माहिती सादर करण्यात आली.

सदर या प्रशिक्षणाकरीता अध्यक्षस्थानी श्री. राम जोशी, अपर आयुक्त, मनपा नागपूर उपस्थित होते व त्यांनी सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांना आवाहन केले की, क्षयरुग्णांचे निदान जास्तीत जास्त करण्यात यावी. रुग्णांना चांगल्या पध्दतीचा उपचार देण्यात यावे तसेच उपचार पुर्ण करुन घेण्यासाठी त्यांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्याचे सांगितले तसेच शासकीय स्तरावरील क्षयरुग्णांना पोषक आहाराकरीता दत्तक घेण्याचे सुध्दा आवाहन केलेले आहे. प्रशिक्षणाकरीता खालील तज्ञ मंडळी उपस्थित होती.

डॉ. नरेन्द्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, मनपा, नागपूर, डॉ. राधा मुंजे, Prof & HOD, Dept. of Respiratory Medicine, आय.जी.जी.एम.सी., नागपूर, डॉ. विजय डोईपफोडे, सीएमओ, एसटीडीसी, नागपूर, डॉ. शिल्पा जिचकार, सीटीओ, नागपूर, डॉ. स्वर्णा रामटेके, जागतीक सल्लागार, नागपूर विभाग डॉ. समीर जहांगीरदार, आयएमए, नागपूर, डॉ. अशोक अढाव, आयएमए, महाराष्ट्र राज्य, डॉ. अर्चना कोठारी, आयएमए, महाराष्ट्र राज्य, डॉ. सुमेर चौधरी, विदर्भ चेस्ट असोसिएशन, डॉ. वैजयंती पटवर्धन, एसटीएसयु, डॉ. राजेश बल्लाळ, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. नैनेश पटेल, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. विवेक गुप्ता, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. आदित्य परिहार, चेस्ट फिजीशियन, नागपूर डॉ. मिलिंद नाईक, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. रविंद्र झारीया, चेस्ट फिजीशियन, नागपूर डॉ. अश्विनी तायडे, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. सरूयद तारीक, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. अनिल सोनटक्के, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. संध्या सावजी, मायक्रोबॉयोलॉजीस्ट, डॉ. राजेश स्वर्णकार, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. विक्रम राठी, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. विक्रांत देशमुख, चेस्ट फिजीशियन, नागपूर, डॉ. आशिष निखारे चेस्ट फिजीशियन, नागपूर व डॉ. जितेंद्र जेसवानी, चेस्ट फिजीशियन, नागपूर हे सर्व उपस्थित असुन हे प्रशिक्षण पार पडले.