Published On : Fri, Jun 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश; जरीपटका येथून एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

Advertisement

नागपूर : जरीपटका पोलिसांनी उशिरा रात्री लुंबिनी नगर येथे कारवाई करत ४५ वर्षीय महिलेला एमडी (मेफेड्रोन) पावडरसह ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांची अंदाजे किंमत ८९,८६० रुपये इतकी असून महिला घरातूनच त्याची विक्री करत होती.

५ जूनच्या रात्री ११:३० च्या सुमारास गस्तीदरम्यान पोलिसांना अनिल गजभिये यांच्या घरात एमडी पावडर साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. तेव्हा प्रीती अनिल गजभिये (वय ४५) घरी उपस्थित होती.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी घराची झडती घेतली असता, स्वयंपाकघरातील एका डब्यात झिप लॉक पिशवीत लपवलेले ४४.९३ ग्रॅम एमडी पावडर आढळून आले. चौकशीत प्रीतिने आर्थिक फायद्यासाठी अमली पदार्थ साठवले असल्याची कबुली दिली.

या प्रकरणी प्रीती गजभिये विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २१(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपपोलीस आयुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक आयुक्त सत्यवान बांदीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पो. हवालदार अरुण क्षीरसागर, पीएसआय शशिकांत तायडे यांच्यासह पोलिस कर्मचारी पंकज ठाकूर, तरंग शर्मा, प्रमोद, मंगेश, राहुल चौहान आणि नमिशा यांनी या ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement