Published On : Wed, Feb 19th, 2020

नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

Advertisement

कामठी :-आज शिवजयंतीच्या दिनी शाळेला सुट्टी असल्याचे निमित्त साधून हरदास नगर कामठी येथील जवळपास 15 च्या वर सहपाठी मित्रांनी सुट्टी साजरी करण्याच्या उद्देशाने नदीवर उत्साह साजरा करण्याचे एकमत करीत आज सकाळी 11 वाजता सर्व मित्र गाडेघाट नदीवरील महादेव घाट च्या पाठीमागील नदीच्या पात्रात पोहायला गेले असता पोहण्यासाठी नदीत उडी मारलेल्या चार मित्रांपैकी दोन मित्र नदीच्या डोहात गेल्याने दिसेनासे झाले दरम्यान भीतीपोटी इतर दोन मित्र नदीबाहेर येऊन बचाव करण्याचे आव्हान करित आरडा ओरड करण्यात आले .

यावेळी जीवन रक्षक पथकाच्या सहाय्याने नदीत बुडालेल्या दोन मुलांचा तबबल दोन तासानंतर शोध लावण्यात यश गाठले मात्र तोवर या दोन्ही मुलांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला असून मृतक दोन मुलामध्ये प्रवेश प्रवीण नागदेवें वय 13 वर्षे , अजेश नितनवरे वय 11 वर्षे दोन्ही राहणार हरदास नगर कामठी असे आहेत. मृतक दोन्ही मुले आई वडिलांसाठी एकुलते एक मुले होते ज्यामुळे कुटुंबात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली असून सदर घटनेसंदर्भात एकच धक्का बसला आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसानी माहिती दिल्यानुसार सदर मृतक दोन्ही मुले हे परिसरातील मित्रासह सुट्टीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा उद्देशाने नियोजित पद्धतीने सर्व 16 च्या जवळपास मित्र हे कन्हान नदीपत्राच्या गाडेघाट नदीवर पोहायला जाण्यासाठी गेले असता महादेव घाट च्या मागील नदी भागात जवळपास चार मोत्राच्या समूहाने नदीत उडी घेतली त्यातील दोन मित्र हे डोहात बुडाल्याने नदीत च वाहून जात असता दिसेनासे झाले यावेळी सोबतीला असलेल्या मित्रानो नदीबाहेर येऊन सर्वत्र माहिती पसरवत जीव वाचवण्याचे आव्हान करण्यात आले .घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेह दिसेनासे झाल्याने मृतकाच्या शोधकामी गाडेघाट गावातील जीवन रक्षक पथकाचे पुरुषोत्तम कावळे व पथकाची मदत घेन्यात आली दरम्यान या पथकाने शोध घेतला असता तबबल दोन तासानंतर मृतकाचा शोध लावण्यात यश गाठले .

पोलिसानी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून घटनेची नोंद करण्यात आली.मृतक प्रवेश प्रवीण नागदेवें हा आई वडिलांना एकुलता एक मूलगा असून याच्या पाठीमागे आई वडोल व दोन बहिणी आहेत तर हा नूतन सरस्वती शाळेतील नवव्या वर्गातील विद्यार्थी होता तसेच मृतक अजेश नितनवरे चा नुकतेच दोन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करण्यात आला असून वडिलाचे काही वर्षांपूर्वी अकस्मात निधन झाल्याने यांच्या ठिकाणी मृतकाची आई खापरखेडा येथील डब्लू सी एल मध्ये नोकरीवर असल्याने हा लहानपनापासूनच कामठी हरदास नगर रहिवासी आजी आजोबांकडे वास्तव्यास असून एकुलता एक मूलगा होता .तसेच हा सेंटजेनेली शाळेतील सातव्या वर्गातील विद्यार्थी होता .

या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून सदर घटनास्थळी यापूर्वी सुदधा डोहात बुडाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत तेव्हा संबंधित प्रशासनाने या प्रकारच्या घटनेची गंभीर दखल घेत या धोकादायक असलेल्या डोह स्थळी दिशादर्शक असे फलक लावून नागरिकांना सावधानतेचा इशारा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement