Published On : Tue, Nov 5th, 2019

खैरी-कवठा-खसाळा मार्गाची दुरावस्था

कामठी:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत हद्दीतील खैरी-कवठा जलद मार्गावर असलेल्या मोठं मोठ्या कंपन्या, गोदाम, गॅस सिलेंडर गोदाम तसेच शाळेमुळे या मार्गावरून जड वाहनांची रेलचेल अधिक प्रमाणात असते परिणामी या मार्गाची दुरावस्था झाली असुन या मार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे या मार्गावरील वाहतूक दारांना अपघाती मृत्यूचे निमंत्रण देत आहे.

खैरी-कवठा -खसाळा जलदगती मार्गावरून दैनंदिन वाहतुकदारांची रेलचेल असते या मार्गावरून 15 टन वजनापेक्षा अधिक जड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत यासंदर्भात रस्त्याची डागडुजी करूनही रस्ता दुरावस्था परिस्थिती जैसे थे होत असल्याने खैरी ग्रा प सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनि ग्रामपंचायत च्या वतीने जड वाहतुकीस बंदी घालुन या रस्त्यावर लोखंडी खांब घालून जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली. तसेच या मार्गावरील कंपन्या, गोडाऊन धारकांना जडवाहतुकीस बंदी असल्याचे नोटीस सुद्धा देण्यात आले तरीसुद्धा या मार्गावरील कंपन्या तसेच गोदाम धारकांनि सदर नोटीस कडे दुर्लक्ष पुरवून जडवाहतुक पूर्ववत सुरू ठेवले परिणामी या मार्गावर काही ठिकाणी जीवितहानी खड्डे पडले जे अपघाती मृत्यूस निमंत्रक ठरत आहेत तेव्हा ग्रा प प्रशासनाने

या मार्गाच्या दुरावस्थेकडे कडे लक्ष पुरवून रस्त्याची सुव्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सरपंच बंडू कापसे:-सदर रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वारंवार या मार्गावरील कंपनी धारकांशी संपर्क साधून रस्ता दुरावस्थेच्या परिस्थिती बाबत अवगत करून जड वाहतूक बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले मात्र या कंपनी धारकांची मनमानी वाढली असून उलट माझ्यावरच अंगावर धावून येत चीतावणी घालतात तर संबंधित वरिष्ठ प्रशासनाचे मला सहकार्य लाभत नसल्याने या समस्येचे निराकरण करायचे कसे ?हा माझ्यासाठी आव्हानात्मक प्रश्न आहे.

संदीप कांबळे कामठी