Published On : Thu, Aug 22nd, 2019

डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन.

व्यक्तीच्या जीवनात ग्रंथाचे महत्व महत्त्वाचे-प्राचार्य डॉ.पी .क़े .यू . पिल्लई

रामटेक : स्थानिक विद्यासागर कला महाविद्यालयात ग्रंथालय व माहिती शास्त्राच्या विभागातर्फे भव्य ग्रंथालय प्रदर्शनाचे आयोजन करून डॉ रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ पिल्लई यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनातून प्राचार्य डॉ.पी .क़े .यू . पिल्लई यांनी व्यक्तीच्या जीवनात ग्रंथाचे महत्व किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले. डॉ आशिष ठाणेकर यांनी डॉ . रंगनाथन यांचा जीवनपट उलगडवून सांगितला आणि या दिवसाचे महत्व पटवून दिले. या प्रसंगी डॉ गिरीश सपाटे, डॉ सावन धर्मपुरीवार, प्रा. अनिल दाणी, डॉ सतीश महल्ले, डॉ सुरेश सोमकुवर, प्रा. रवींद्र पानतावणे, युनूस पठाण यांची उपस्थिती होती .

महाविदयालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले .विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमात आपल्या कला गुणांची प्रचिती दीली त्याबद्दल प्राचार्य पी .क़े .यू .पिल्लई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता महाविद्यालयाचे स्टाफ ने परिश्रम घेतले .