Published On : Mon, Sep 4th, 2017

डॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजू वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली येथे यासंदर्भातील नियुक्ती पत्रक प्रसिद्ध केले. डॉ. वाघमारे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.