Published On : Tue, Dec 14th, 2021

डॉ. प्रितम गेडाम यांना “तेजभूषण जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2021” जाहीर

Advertisement

चांगल्या कार्याला नेहमी प्रोत्साहनाची साथ मिळायला हवी जेणेकरून निस्वार्थ सेवाभावी कार्य आणखी जोमाने चालले पाहीजे. असेच सेवाभावी कार्याला माणूसकीचा सलाम म्हणून राज्यातील अग्रणी सेवाभावी संस्था “तेजभूषण फाऊंडेशन” दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ योगदानाबद्दल मोलाचा कार्याची दखल घेवून उत्कृष्ट कार्यकर्त्यांना राज्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा असा हा “तेजभूषण जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार” द्वारे सन्मानित करून त्यांच्या कार्याला शाबासकीची थाप देते.

ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्या वर्षी उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्याकरीता आपल्या नागपुर शहराचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रितम भि. गेडाम यांची निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षित डॉ. गेडाम निरंतर सेवाभावाने सामाजिक गंभीर समस्या, विकास व जनजागृतीवर सातत्याने लिखाण करीत आहेत. देशाचा प्रत्येक राज्यातून सोबतच विदेशातून देखील हजाराहून जास्त त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.

समाजाचा प्रत्येक घटक, प्रत्येक वर्गाला जागृक करण्याचे ध्येय मनी साधून वनीकरण, पर्यावरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, शिक्षण, करीअर मार्गदर्शन, रोजगार उन्मुख, शैक्षणिक समुपदेशन व व्याख्याने करीत असतात. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अनेक संस्थेंसोबत सामाजिक उपक्रम देखील राबवत आहेत.

ज्या समाजात आपण वावरतो त्याकरीता प्रत्येक मानवाचे समाजाला काही देणे लागते आणि परोपकाराची भावना सर्वाचा अंगी असलीच पाहीजे असे विचार ठेवूनच डॉ. प्रितम भिमराव गेडाम निस्वार्थपणे सेवा कार्य करीत आहेत व विपरीत परिस्थितीत सुद्धा ते खंबीरपणे कार्य करीत आले. हे प्रतिष्ठीत “तेजभूषण जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार” 26 डिसेंबर रोजी पुणे येथे राजकीय, सामाजिक, अधिकारी वर्ग व आमंत्रित नागरिकांच्या उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. ह्या पुरस्कारकरीता निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.