Published On : Thu, Dec 27th, 2018

डॉ. पंजाबराव देशमुख जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती ‍निमित्त नगरीच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार, विपक्ष नेता श्री. तानाजी वनवे व नगरसेवक श्री.किशोर जिचकार, सुनिल हिरणवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठा समोरील स्व. भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी मा.आमदार श्री.सुनिल केदार, आमदार श्री. परिणय फुके, सौंदर्यीकरण समिती सचिव बबन चौधरी, अशोकराव म्हात्रे, पंजाबराव कृषी विदयापीठ व शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.