Published On : Wed, Jan 2nd, 2019

‘प्रत्तेकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विनोदकुमार जयस्वाल

रामटेक :१ जनेवारी हा दिवस विद्यासागर कला महाविद्यालयात विद्यासागर शिक्षण संस्था तसेच ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक , अध्यक्ष स्व. डॉ. विनोदकुमार जयस्वाल यांचा १९ वा स्मृतीदिवस म्हणून आयोजित करण्यात आला.

या प्रसंगाचे औचित्य साधून विद्यासागर कला महाविद्यालयात श्रद्धांजलि सभेचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध विचारवंत, प्रख्यात वक्ते क्रिष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस, कराड चे कुलपति डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. स्व.डॉ. विनोदकुमार जयस्वाल, स्व.डॉ. श्रीकांत जीचकार, डॉ. उदय बोधनकर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा या चार वर्गमित्रांची मैत्री सर्वश्रृतच आहे.

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी स्व.डॉ.विनोदकुमार जयस्वाल यांच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा व जीवनमूल्यांचा आढावा घेतला. समाजातील प्रत्तेक माणसाला सोबत बरोबरीने घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विनोदकुमार जयस्वाल होत’ असे प्रतिपादन त्यांनी केले.


प्रस्तुत श्रध्दांजली सभेला संस्थेच्या सचिव अनिता जयस्वाल , अॅड. अनूप जयस्वाल , प्रा. टी.डी,. लोधी, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौकसे, केवल हटवार, कमलेश टक्कामोरे, डॉ. प्रदीप रणदीवे, प्राचार्य. गीता भास्करन, योगिता गायकवाड़, सुनील कोल्हे, तसेच परिसरातील अनेक गणमान्य नागरिक, पत्रकार उपस्थित होते. विद्यासागर कला महाविद्यालयातिल सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, अॅड. नंदकिशोर जयस्वाल, विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यर्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्थाविक प्राचार्य डॉ. पी.के.यू. पिल्लई यांनी केले तर सूत्र संचालन डॉ.सुरेश सोमकुवर यांनी केले.