नवी दिल्ली : माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशभरात ७ दिवसांचा शोक जाहीर केला आहे. सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.41 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवार (२८ डिसेंबर) दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, रामदास आठवले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह संपूर्ण गांधी कुटुंब उपस्थित होते. त्यासोबत अनेक राजकीय नेत्यांनी यावेळी हजेरी लावली.