Published On : Mon, Dec 3rd, 2018

डॉ. राजेन्द्र प्रसाद जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, सभापती आरोग्य समिती श्री. मनोज चापले यांनी सकाळी टेलीफोन एक्सचेंज चौक, सी.ए.रोड स्थित डॉ.राजेन्द्र प्रसाद यांच्या प्रतिमेला म.न.पा.तर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी सर्वश्री प्रदीप खानोरकर, सुभाष गोतमारे, ॲङ पुरुषोत्तम घाटोळे, मधुकर वनकर, मुकुंद शेटे, किशोर शिरपूरकर, महादेवराव भोयर, स्वप्नील समर्थ, आशीष बन्सोड, प्रशांत माताघरे आदी उपस्थित होते.