Published On : Wed, Jul 22nd, 2020

डॉ. भदंत सावंगी मेधनकर यांच्या जयंती प्रित्यर्थ अभिवादन

Advertisement

नागपूर : डॉ. भदंत सावंगी मेधनकर यांच्या जयंती प्रित्यर्थ भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी कामठी मार्गावरील बुद्ध भूमी खैरी येथील त्यांच्या निर्वाण स्थळी भेट देउन अभिवादन केले. डॉ. भदंत सावंगी मेधनकर यांनी पूज्य भदंत कौसल्यायन यांच्याकडून दीक्षा घेउन त्यांचे शिष्यत्व पत्कारिले होते. डॉ. मेधनकर यांचे मुळ जन्मगाव गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी हे गाव आहे.

त्यांनी श्रीलंकेला जावून बुद्ध धम्माचा अभ्यास केला. श्रीलंकेवरून आल्यानंतर धम्म प्रचार प्रसारासाठी ते काही काळ दीक्षा भूमी नागपूर येथेही राहिले. त्यानंतर ते बुद्ध भूमीला गेले व तेथून धम्म प्रचार प्रसाराच्या कार्याला गती दिली.


बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारातही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. आजही बुद्ध भूमी खैरी येथे धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य अविरत सुरु आहे. निराधार मुलांना दत्तक घेउन त्यांना धम्म ज्ञान दिले जाते तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही बुद्ध भूमी मार्फत उचलला जातो. याशिवाय गरीब व गरजू मुलामुलींचे लग्नही बुद्ध भूमी द्वारे लावून दिले जाते. त्यांच्या कार्याला स्मरण करून ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संवेदना अर्पण केल्या. याप्रसंगी भंते प्रज्ञाज्योती प्रामुख्याने उपस्थित होते.