Published On : Tue, Aug 31st, 2021

डॉ. हापसे यांना गडकरींची श्रध्दांजली

नागपूर: डॉ. डी. जी. हापसे यांच्या निधनाने आपण शेतकर्‍यांचा खरा कैवारी असलेला कृषी शास्त्रज्ञ गमावला आहे, अशा शब्दात केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. हापसे यांना श्रध्दांजली अर्पण केली. नुकतेच पुण्यात डॉ. हापसे यांचे निधन झाले.

अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये आम्हाला त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असे. ते अतिशय अभ्यासू होते. त्यांनी संपूर्ण जीवन शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम केले.

तसेच शेतकर्‍यांसाठी संशोधन केले. त्यांच्या निधनाने शेतकर्‍यांचा खरा कैवारी हरपला असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी हा मोठा आघात असल्याच्या भावनाही ना. गडकरी यांनी व्यक्त केल्या.