Published On : Tue, Aug 31st, 2021
By Nagpur Today Nagpur News

८५ कुलर्समध्ये सापडल्या डेंग्यूच्या अळया

Advertisement

सोमवारी शहरातील ७८५९ घरांचे सर्वेक्षण

नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून सोमवारी ३० ऑगस्ट रोजी शहरातील ७८५९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवारी (ता.३०) झोननिहाय पथकाद्वारे ७८५९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी २६१ घरे ही दुषित आढळली म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय ६० ताप असलेले रुग्ण आढळून आले. १५५ जणांच्या रक्ताचे नमूने तर २१ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान ९८९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ८५ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे ७६ कुलर्स रिकामी करण्यात आले. ३८५ कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर ४५२ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच ७६ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement