Published On : Fri, Jun 21st, 2019

नागपूरचे डॉ.भोजराज लांजेवार आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित

नागपुर: सिक्कीम ची राजधानी गंगटोक येथे 09 जून 2019 रोजी समता साहित्य अकादमी, यवतमाळ च्या वतीने आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सामाजिक व शिक्षण क्षेत्रामध्ये आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे, केन्द्रीय विद्यालय, ऑर्डनेंस फैक्टरी, डिफेंस, नागपुर येथील शिक्षक व कवी डॉ. भोजराज लांजेवार यांना आंतरराष्ट्रीय पातळी वरील ग्लोबल अचीवर्स अवार्ड-2019 पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूटान चे शिक्षण मंत्री श्री प्रा. ठाकुर पौडयाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

शाल,प्रमाणपत्र, सम्मान चिन्ह व सुवर्ण पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सिक्किमचे अन्न सुरक्षा व कृषि विकास मंत्री मा. लोकनाथ शर्मा हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते.

डॉ. भोजराज लांजेवार यांना आतापर्यंत 07 स्टेट अवार्ड, 04 राष्ट्रीय अवार्ड व 03 आन्तरराष्ट्रीय अवार्ड मिळालेले आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात समता साहित्य अकादमी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. देवानंद तांडेकर, सूत्र संचालिका कु. निकिता तांडेकर, युवा अध्यक्ष श्री. रोहित तांडेकर, सिक्किम चे समन्वयक श्री. प्रेम गुरंग, प.बंगालचे जनसंपर्क अधिकारी श्री. कमल कुमार सोबतच संपूर्ण देशातील प्रतिनिधी,व पुरस्कारप्राप्त विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.