Published On : Sun, Nov 12th, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक 100 टक्के होणार – देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: यशवंत स्टेडियम परिसर धंतोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक 100 टक्के होणार असून नागपूर महानगरपालिकेने तीन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाकडे सादर करावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मनपा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रविण दटके यांच्यासह बसपा पक्षनेता मो. जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नरेंद्र वालदे, मो. इब्राहीम, धर्मपाल मेश्राम आदी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


अनेक वर्षांपासून प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे कार्य सुरु करावे अशी मागणी मागिल महिन्यात झालेल्या मनपाच्या आमसभेत नगरसेवकांनी केली. यावर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी पुढील आमसभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची या विषयावर नगरसेवकांची चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. हेच शब्द पाळून शनिवारी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच स्मारकाचे कार्य जलद गतीने करण्याची विनंती केली. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक 100 टक्के होणार असून तीन महिन्यात मनपाचे याचा आराखडा तयार करुन शासनाकडे पाठवावा असे निर्देशही दिले. शिष्टमंडळात महेंद्र धनविजय, प्रमोद तभाने, नागेश सहारे, अभय गोटेकर, संदीप गवई, अमर बागडे, संजय बुर्रेवार, वंदना चांदेकर, ममता सहारे, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, मो. तौफिक अहेमद यांचा समावेश होता.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement