Published On : Wed, Apr 15th, 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयामध्ये महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून नगरीतर्फे अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नागपूर महानगरपालिका आणि शहरात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम न करता सामाजिक अंतर ठेवून शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून संपूर्ण नागपूर नगरीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.