Published On : Tue, Jul 21st, 2020

डॉक्टर अनंतवार यांचा सत्कार

रामटेक -कोरोना महामारी मध्ये संपूर्ण देश आज लॉक डाऊन च्या ताब्यात आहे . दिवस न दिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संपूर्ण देश हा कोरोना मुळे त्रस्त झाला आहे. पण अश्यात आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील सर्व डॉक्टर्स सतत दिवस रात्र काम करत आहे.

आज दिनांक 20 जुलै ला आकाश झेप फाउंडेशन तर्फे डागा हॉस्पिटल च्या टीम नि प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे रक्तदान शिबीर आयोजित केला होता .

Covid योद्धा म्हूणन.प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर चे वैदाकिय अधिकारी डॉक्टर अनंतवार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर चा स्टाफ उपस्थित होता.