Published On : Wed, Jul 8th, 2020

डॉ. आंबेडकर यांचे निवास्स्थान म्हनजे आमची अस्मिता व आमच्या पवित्र राजगृहावर तोडफोड करणा-याना अटक करा— गजभिये

– राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार व गृहमंत्री मा अनिल देशमुख यांना विभागीय आयुक्त श्री संजीव कुमार यांच्या माध्यमातुन पाठवले पत्र

नागपुर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घृणास्पद घटनेचा राष्ट्रवादिचे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी या मनुवादी व जातिवादी प्रवुतिचा निषेध केला.व या घटनेतिल आरोपीना त्वरित अटक करन्यात व त्यांना क़ठोर शिक्षा करन्यात यावी या आशयाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवन्याची विनंती नागपुर विभाग़ाचे विभागीय आयुक्त श्री संजीव कुमार यांना निवेदन देन्यात आले.व श्री संजीव कुमार यांनी त्वरित माननीय मुख्यमंत्री महोदयांना कळवन्यात येईल असे सांगीतले.राजगृह येथिल घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.

आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी व नरधमांना क़ठोर शिक्षा करण्याची मागनी राष्ट्रवादिचे आमदार प्रकाश गजभिये यानी केलीआहे..यावेळी शिष्टमंडळात गोपी अंभोरे,अविनाश तिरपूड़े,संतोष नरवड़े,विक्की रूंघे,संदीप शाहू,हेमंत भोतमांगे,राजेश झुंजालकर,दुर्गादास केवलरामानी,राजू राठी,प्रमोद मिश्रा,चंदू अग्रवाल,राजा खान व जावेद अंसारी आदि उपस्थित होते.