Published On : Mon, Jan 21st, 2019

डॉ.आंबेडकर अंतरराष्ट्रीय मेडीटेशन सेंटर सिहोरा ला २ कोटी अनुदान प्राप्त

कन्हान : – अहिल्याबाई होलकर बहुउदेशिय शिक्षण संस्था, सिहोरा कन्हान ता.पारशिवनी ज़िल्हा नागपुर यास सामाजिक न्याय, विशेष साहय्य विभाग, महाराष्ट्र राज्य च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय मेडीटेशन सेंटर सिहोरा कन्हान ला २ कोटी रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या मेडिटेशन सेंटरचे काम (बंधकाम) पूर्णत्वास येत आहे .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मेडीटेशन सेंटर चे उदघाटन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र, सामाजिक न्याय मंत्री मा.राजकुमार बडोले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास बुद्धिस्ट राष्ट्राचे प्रतिनिधी प्रामुख्याने आमंत्रित करण्यात येणार आहे.

उपरोक्त माहीती संस्थेचे सचिव नितिन गजभिये यांनी दिली आहे. संस्थेच्या वतीने ना.राजकुमार बडोले मंत्री सामाजिक न्याय विभाग यांचे अनुदान दिल्या बद्दल शत: शा आभार व्यकत करण्यात आले आहे .