Published On : Wed, Apr 15th, 2020

डॉ आबेंडकर जयंती सॅनिटाईझर मशीनचे उद्घाटन करून साजरी

Advertisement

कन्हान : – विश्वरत्न डॉ बाबासाहेब भिम राव आबेंडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्य आपातकाळ सामाजिक संघटना व सामाजिक संस्था कन्हानच्या कार्यकर्त्या व्दारे स्वत: तयार करून लाव ण्यात आलेल्या सॅनिटाईझर मशीनचे पोलीस स्टेशन कन्हान येथे उद्घाटन करून साजरी करण्यात आली.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्या करिता एकवीस दिवसाच्या लॉकडाऊन मुळे निर्माण गोरगरिबाच्या समस्या सोड विण्याच्या दुष्टीने सतत वीस दिवसापासु न विविध मदत व सेवा कार्य करणा-या आपातकाळ सामाजिक संघटना कन्हान व्दारे (दि.१४) एप्रिल विश्वरत्न डॉ बाबा साहेब आबेंडकरांच्या १२९ व्या जयंती निमित्य कन्हान पोलीस स्टेशन येथे नाग रिकांच्या सुरक्षेकरिता रात्र दिवस कार्य करणा-या पोलीस अधिकारी व कर्मचा-र्याची काळजी घेण्याच्या सार्थ दुष्टीने आपातकाल सामाजिक संघटना, राजे ग्रुप कन्हान, युवा चेतना मंच परशिवनी, नेहरू युवा केंद्र नागपूर, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीयसंस्था टेकाडी यांच्या सहकार्यातुन स्वत: तयार करून सॅनिटाईझर मशीन लावुन कन्हान चे थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबाच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून सॅनिटाईझर मशीन चे उद्घाटन करून डॉ बाबासाहेबाची जयंती साजरी करण्यात आली.याकरिता विकास मेहर व प्रज्वल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सॅनिटाईझर मशीन लावण्यात आल्या ने पोलीस कर्मचा-यांमध्ये नवीन उत्साह पाहण्यास मिळाला. नगरपरिषद कन्हान व्दारे साहित्य पुरवठा केल्यास नगरपरि षद, प्राथमिक आरोग्य केंद्र, बॅंक, दवाखा ने येथील अधिकारी, कर्मचारी व नागरि कांना सुध्दा ही सेवा उपलब्ध करून देता येईल.

अशी विनंती आपातकाळ सामाजिक संघटना व्दारे करण्यातआली आहे. मदत सेवाकार्यास आपातकाळ सामाजिक संघटना अध्यक्ष प्रमोद वान खेडे, कैलास भिवगडे, निलेश गाढवे, विनोद कोहळे, केतन भिवंगडे, श्याम मस्के, रितेश जनबंधु, शुभम चहांदे, रोशन सोनटक्के, अशोक बनकर प्रवीण हुड, प्रमोद शर्मा, ऋृषभ बावनकर , अभिजीत चांदुरकर सह अनेक कार्यकर्ते परिश्रम करित आहे.

Advertisement
Advertisement