Published On : Fri, Jul 27th, 2018

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना म.न.पा.तर्फे अभिवादन

उज्वल भारताची प्रतिमा विद्यार्थ्यांच्या मनात बिंबविणारे, व्यक्तिमत्व, मिसाईल मॅन म्हणून ज्यांनी भारताच्या अणुकार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली असे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आज दिनांक २७ जुलै, २०१८ रोजी म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राला मा.महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त श्री. रविन्द्र कुंभारे, उपायुक्त श्री. राजेश मोहिते, अति.उपायुक्त श्री. जयंत दांडेगावकर, सहा.आयुक्त (सा.प्र.) महेश धामेचा, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, दिलीप तांदळे, राजेश वासनिक, राकेश चाहांदे, देवेन्द्र इंदूरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.