Published On : Mon, Oct 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जंतर-मंतरवर आंदोलनांचे दरवाजे बंद;दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय चर्चेत

Advertisement

जंतर-मंतरवर आंदोलनांचे दरवाजे बंद;दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय चर्चेत

नवी दिल्ली : देशातील अनेक ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीतील जंतर-मंतरबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, आंदोलनांसाठी तीन पर्यायी ठिकाणे निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांच्या कथित परिपत्रकानुसार, आता सार्वजनिक सभा आणि निदर्शनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीजी ग्राउंड या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध असेल. रामलीला मैदानावर ५० हजार लोकांच्या क्षमतेच्या सभांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जाते. तर मोठ्या रॅली आणि जनसमुदायासाठी बुराडी मैदान व सीबीजी ग्राउंडचा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे.

जंतर-मंतर हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांच्या आंदोलनांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि कुस्तीपटूंचे आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडींमुळे या ठिकाणाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. मात्र, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या कारणांमुळे आंदोलनांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या घडामोडींमुळे राजधानीतील आंदोलनांच्या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, जंतर-मंतरवरील सर्व आंदोलनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत आदेशाची पुष्टी होणे आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.