नवी दिल्ली – दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गीतांजली यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. यादरम्यान त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या हेअरस्टाईल, मॉर्डन लुक आणि साडी या हटके लूकमुळे त्या प्रसिद्धी झोतात आल्या होत्या.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्विट करत गीतांजली अय्यर यांना श्रद्धांजली वाहिली. दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट करत ठाकूर यांनी शोक व्यक्त केले.
अय्यर यांनी दूरदर्शनमध्ये 1971 साली वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आजवरच्या नामवंत वृत्तनिवेदकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आवर्जून केला जातो. 1989 साली त्यांना इंदिरा गाधी प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.