Published On : Sat, Mar 28th, 2020

आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका ;सरकारच्या सूचनांचे पालन करा…

Advertisement

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सोशल मीडियावरुन जनतेला आवाहन…


मुंबई : प्रचंड प्रगत देशात कोरोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत त्यामुळे आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका… पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

जयंत पाटील यांनी स्वतः च्या फेसबुक पेजवरुन आज जनतेशी संवाद साधला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसाचे लॉकडाऊन का जाहीर केले हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा संसर्ग असेल तर या दिवसात त्या व्यक्तीची लक्षणे समजणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनची शिस्त पाळली पाहिजे नाहीतर आपल्याला फार मोठे परिणाम भोगावे लागतील अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी जगात ५ लाख ९ हजार ६४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. २४ तासात ४६ हजार ४८४ ही लागण होत आहे. तर अडीच हजार मृत्यूमुखी पडले आहेत. दुर्दैवाने हे आकडे आपल्याला ऐकायची वेळ आली आहे. भारतात ७२४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ७५ नव्या केसेस आहेत. आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात ४ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मांडली.

जगात अशी आकडेवारी कधी ऐकली गेली नाही. इतका गंभीर स्वरूपाचा हा व्हायरस आहे त्यामुळे आपण याबाबत गंभीर आहोत का याचा अभ्यास करायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले.

सांगली जिल्हयाचे पालकमंत्री असल्याने जयंत पाटील यांनी तिथली परिस्थितीही समोर मांडली. एकूण २३ लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शिवाय एक कोल्हापूरहून केस आली आहे अशी २४ लोकांना ही लागण झाली आहे. हा व्हायरस परदेशातून आला आहे. आतापर्यंत ७७६ लोकांनी परदेश प्रवास केला आहे. त्यापैकी ३७ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर १२ लोकांचे पॉझिटिव्ह आले आहेत. ६९४ लोकांना कोरोटाईंन करण्यात आले आहे. ३२ जणांना १४ दिवस पुर्ण तर ५६२ लोकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ८ व्यक्तींनी याचा भंग केला म्हणून सक्तीने ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २४ लोकं कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हयात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

हे संकट टाळायचे असेल त्याचा बिमोड करायचा असेल तर घरातच रहा. काही लोक रिलॅक्स होण्यासाठी बाहेर विनाकारण फिरत आहेत. मात्र पुढचे १४ दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा. घरात बसणे हेच पुढारपण आहे. कोरोना व्हायरस घालवण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत असताना राज्यभरातून अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत काळजी घ्या घराबाहेर पडू नका अशा सूचनाही जयंत पाटील यांनी जनतेला दिल्या.

Advertisement
Advertisement