Advertisement
नागपूर: सामुहिक आत्महत्येच्या घटनेनं मंगळवारी नागपूरात खळबळ उडाली. पती पत्नी आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. एकाच कुटूंबतील चार जणांची आत्महत्या केल्याने सगळेच हादरुन गेले आहेत.
कोराडी रोड ओमनगर परीसरातील राणे कुटुंबियांनी हा टोकाचा निर्णय घेतला. धीरज राणे हे प्राध्यापक आहेत, तर पत्नी सुषमा राणे या डॉक्टर आहेत. 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी अन्या यांचाही यात समावेश आहे. आत्महत्येचं कारण अजुन कळालेलं नाही.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशीला सुरुवात झाली आहे.