Published On : Wed, Nov 15th, 2017

प्रलंबित डी.पी. रोडचे काम मार्गी लावा

Advertisement


नागपूर: शहरातील प्रलंबित डी.पी. रस्त्यांचे काम मार्गी लावा. ज्या मार्गात अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करा, असे निर्देश प्रवीण दटके समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महानगरपालिकेच्या प्रस्तावित असलेल्या बी.ओ.टी., पी.पी.पी. तसेच केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता नेमण्यात आलेल्या प्रवीण दटके समितीची बैठक मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीचे आमंत्रित सदस्य स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, स्थापत्य समितीचे सभापती व समितीचे सदस्य संजय बंगाले, विजय झलके आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला नगर रचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, विकास अभियंता सतीश नेरळ उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये प्रलंबित डी.पी. रस्त्यांना तातडीने मार्गी लावण्याचे सांगतानाच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काम पूर्ण करा, असे निर्देश श्री. दटके यांनी दिले. सदर बैठकीत सक्करदरा शॉपिंग कॉम्प्लेक्स, डिग दवाखाना, सोख्ताभवन आदींचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. यशवंत स्टेडियम परिसरात प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सर्व अडचणी दूर झाल्या असून त्याचे डिझाईन तातडीने तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भातील सर्व कागदपत्रे पूर्ण झाले असून निधीची उपलब्धताही आहे. तातडीने निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एल.पी.जी. शवदाहिनीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. आयुक्त अश्विन मुदगल यांनी सुद्धा प्रकल्प तातडीने पुढे नेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Advertisement
Advertisement