बेला : निम्न वेना प्रकल्पाच्या वडगाव व नांद जलाशयातून नदीपात्रात पाणी सोडणे सुरू असल्यामुळे दोन्ही नद्या दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील लोकांनी स्वतःसह कुटुंबीयाची व इतरांच्या जानमालाची व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी .कोणीही नदीपात्र ओलांडू नये . असे आवाहन नागपूर पाटबंधारे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश डुमणे ,शाखा अभियंता प्रणील शेंडे व वाघ यांनी केले आहे.
वडगाव जलाशय 76 टक्के भरले असून सद्यस्थितीत पाणी पातळी 254.08 मी. व जलस्तर 102.832 दलघमी आहे त्यामुळे तीन गेट पंचवीस सेंटीमीटरने उघडले असून 66.63 M3/ प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. शडेश्वर येथील नांद जलाशय 52 टक्के भरले असून त्यामुळे दोन गेट पाच सेंटीमीटरने उघडले आहे. पाण्याचा 8.52 m3/ प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणाचे पाणी नदीपात्रात सोडणे सुरू आहे त्यामुळे कोणीही नदी ओलांडू नये व स्वतः इतरांची ही सुरक्षा करावी असे आवाहन सूत्रांनी केले आहे.