Published On : Sat, Oct 7th, 2017

सिमेंट रोड साठी वॉल कंपाउंड तोडू नये गौतम नगरवासीयांचे निवेदन

कामठी: येथील प्रभाग 15 तील गौतम नगर छावणी च्या नागरिकांनी नगराध्यक्ष शाहजहा शफात अन्सारी तथा मुख्याधिकारी मनोज देसाई यांना शुक्रवारी निवेदन देऊन पोरवाल कॉलेज ते मुस्लीम कब्रस्तान सिमेंट रोड निर्माण करिता घरांच्या कंपाउंड वॉल तोडण्यास विरोध दर्शविला आहे.

जवळपास शंभर नागरिकांच्या हस्ताक्षर चे निवेदन नप अध्यक्ष और मुख्याधिकारी यांना विरोधी पक्ष नेता लालसिंग यादव नगरसेविका संध्या रायबोले माजी नगरसेवक प्रशांत नगरकर यांच्या नेतृत्व मध्ये देण्यात आले.

अध्यक्ष शाहजहा शफात अन्सारी तथा मुख्याधिकारी मनोज देसाई यांनी न प अभियंता सोबत जाऊन मौका चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्या चे आश्वासन शिष्टमंडळा ला दिले.

शिष्टमंडळात धम्मदिप शेंडे, धम्मपाल नागदेवे, सुबोध चांदोरकर, वंदना आडे, मिथुन चांदोरकर,हर्ष डांगे,सुरेखा चांदोरकर, मनिष डोंगरे,राजेश चहांदे,अविनाश गजबे,विजय फुले,अविनाश तांबे यांचा समावेश होता.