Published On : Fri, Jul 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पावसाचे कारण पुढे करून अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका, नाना पटोलेंचा इशारा

Advertisement

मुंबई : राज्यात काही भागात अतिवृष्टी होत असून जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. यात पावसाळी आधिवेशनही सुरु आहे. गंभीर परिस्थिती लक्षात घेता सरकाकडून अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे . परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.पावसाळी अधिवेशन संपविण्यासाठी एक आठवडा बाकी आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, तरुणवर्ग, महिला, बेरोजगारी, महागाईसह अनेक प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसाठी अधिवेशन हेच महत्वाचे व्यासपीठ आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवले पाहिजे.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली. यावरही पटोले यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनेक वर्ष संघ विचारातून आलेल्या भाजपाबरोबर युतीत होती. आरएसएस गांधींबद्दल जे सांगत होते ते चुकीचे आहे हे त्यांना आता समजले आहे. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरे यांना आता वास्तवाची जाणीव झाली आहे,असेही पटोले म्हणाले. भाजपा फक्त धर्माच्या नावावर राजकारण करत असून भाजपा फक्त सत्तेचा आहे, असा घाणघातही पटोले यांनी केला.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement