Published On : Fri, Nov 8th, 2019

दिव्यांग्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे तहसिलदार ला घातले साकडे

कामठीच्या शासकीय कार्यालयात दिव्यांगांची फरफट संदर्भात शिवसेनेचे तहसिलदारला सामूहिक निवेदन सादर

कामठी: दिव्यांग्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी शासनाने पूर्वीच्या नियमात सुधारणा करीत 2016 मध्ये स्वतंत्र आदेश काढले त्यानुसार प्रत्येक कार्यालयात दिव्यांग व्यक्तीसाठी सरकारी इमारती मध्ये पोटॅबल रॅम्प, हॅन्डरेल, ट्रक टाईल्स पाथ, व्हीलचेअर्स, स्वतंत्र पार्किंग , स्वच्छतागृहे, लिफ्ट आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे पण कामठी तालुक्यातील समस्त शासकीय कार्यालयाचा विचार केला असता तालुक्यातील कुठल्याही शासकीय कार्यालयाकडून याचे तंतोतंत पालन होताना दिसून येत नाही परिणामी शासकीय कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग्याची गौरसोय होत असल्याचा प्रकार दररोज दिसून येतो.तसेच एकूण आर्थिक स्रोतातुन दिव्यांग्याना देण्यात येणारा हीस्याचा वाटा तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आले नसून या लाभासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नाहक माणसीक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा दिव्याग्याना त्यांच्या हक्काचा लाभ देण्यात यावा यासाठी शिवसेना कामठी तालुका उपप्रमुख राजन सिंग यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासह आज कामठी तहसीलदार अरविंद हिंगे यांना साकडे घालून सामूहिक निवेदन सादर करण्यात आले .सोबतच कामठी तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.

याप्रसंगु शिवसेना नागपूर जील्हा युवासेना प्रमुख शुभम नवले, आकाश तांनडे, समीर सोनारे, तुषार देशमुख,राहुल चौधरी, उमेश कातोरे, कपूर चांभारे, आकाश मललेवार, राहूल वंजारी, संदीप जुल्फिकार, सुदर्शन लसंते, रोशन बांडेबूचे, गोलू, सैय्यद अन्सारी, गणेश सहारे, निलेश व आदी शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

– संदीप कांबळे कामठी