Published On : Tue, Sep 12th, 2017

जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापतीपदी दिव्या धुरडे अविरोध

नागपूर: जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापतींची निवड प्रक्रीया आज (ता. 12 सप्टेंबर) रोजी पार पडली. पीठासीन अधिकारी महापौर नंदा जिचकार होत्या. त्यांनी समितीच्या सभापतीपदी दिव्या धुरडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.

नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या वेळेत दिव्या धुरडे यांनी निगम सचिव हरिश दुबे यांच्याकडे अर्ज सादर केला. सूचक निशांत गांधी तर अनुमोदक सोनाली कडू होत्या. जैविक विविधता व्यवस्थापन समिती सभापतीपदी दिव्या धुरडे यांचे एकमेव नामनिर्देशन अर्ज निगम सचिव यांच्याकडे प्राप्त झाला.

नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी दिलेला अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर नंदा जिचकार यांनी जैविक विविधता व्यवस्थापन समिती सभापतीपदी दिव्या धुरडे यांची निवड झाल्याची घोषणा केली व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर अनिश्चित काळासाठी पीठासीन अधिकारी यांनी सभा स्थगित केली.

समिती सदस्यांमध्ये नगरसेविका सुषमा चौधरी, निशांत गांधी, सोनाली कडू, आशा उईके, वैशाली नारनवरे यांचा समावेश आहे. यावेळी निगमसचिव हरिश दुबे, उद्यान अधिक्षक सुधीर माटे यांची उपस्थिती होती.