Published On : Thu, Nov 21st, 2019

अर्थसहाय्यातून दिव्यांग बांधव होणार स्वावलंबी

महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास : दिव्यांगांना व्यवसायाकरिता धनादेश प्रदान

Advertisement

नागपूर : दिव्यांग बांधवांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटावा यासाठी शासनातर्फे विविध योजना कार्यान्वित आहेत. दिव्यांग बांधवांनी स्वत:चा व्यवसाय उभा करुन त्यातून अर्थार्जन करावे, त्या माध्यमातून स्वयंसक्षम व्हावे यासाठी त्यांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शासनाच्या योजनेमार्फत होणा-या अर्थसहाय्यामुळे दिव्यांग बांधव व भगीनी व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व आत्मविश्वासू होतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

Advertisement

मनपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत व्यवसायाकरिता अर्थसहाय्य या योजनेद्वारे बुधवारी (ता.२०) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दिव्यांगांचे तीन बचत गट व ७ जणांना व्यवसायाकरिता २६ लाख ९१ हजार ८७१ रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये महापौरांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, मनपा उपायुक्त डॉ.रंजना लाडे उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर शिक्षण, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये दिव्यांग बांधव नाव लौकीक करीत आहेत. दिव्यांगांच्या मनात कुठेही इतरांवर अवलंबून असल्याची भावना राहू नये, त्यांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा शासनाच्या योजनेचा हेतू आहे. या योजनेद्वारे दिव्यांग बांधव व्यवसायातून प्रगती साधतील व स्वत:सह इतरांनाही स्वावलंबी करतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी मनपा उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी मनपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत व्यवसायाकरिता अर्थसहाय योजनेबाबत माहिती दिली. अर्थसहायक करण्यात येणा-या दिव्यांगांकडून करण्यात येणा-या व्यवसायाबाबत त्यांना आधी प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना व्यवसायाचे बारकावे सांगण्यात आले आहेत. मनपाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत होणा-या महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून या नव्या व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत तीन बचत गट व सात दिव्यांगांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करण्यात आले. दिव्यांग स्वाभिमान पुरूष बचत गट, दिव्यांग विकास पुरूष बचत गट, पाउल पुरूष दिव्यांग बचत गट यांच्यासह राहुल बैसवारे, मिथुन पाटील, विलास चिकटे, आशिष चरडे, सतीश भिसीकर, धर्मेंद्र जयस्वाल व रंजीता गजभिये या सर्वांना व्यवसायाकरिता एकूण २६ लाख ९१ लाख ८७१ रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. सदर योजना दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात अंतर्गत स्थापित बचत अभियान अंतर्गत स्थापित कार्य बल समिती च्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी मनपा समाजकल्याण विभागाचे चंद्रशेखर पाचोळे, रितेश बांते, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे, प्रमोद खोब्रागडे, विकास बागडे, कल्पना अरमरकर, चित्रा लोखंडे, कविता फुलझले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement