Published On : Fri, Jan 3rd, 2020

पतसंस्था आयकर अडचणी बाबत केद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना जिल्हा पतसंस्था संघाचे निवेदन

Advertisement

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांना आयकर विषयक अनेक अडचणीना सध्या सामोरे जावे लागत आहे. पतसंस्थाना आयकर अधिनियम ,१९६० चे कलम ८० (पी) अंतर्गत मिळणाऱ्या उत्पन्नावर जरी सूट असली तरीही सुद्धा तरलते पोटी करावयाची गुंतवणूक बँकेला केली असता त्यावर मिळणारे व्याजाचे उत्पन्न हे अन्य स्त्रोत गृहीत धरून त्यावर आयकर आकारणी करण्यात येत आहे.

दि.०२ नोव्हेबर २०१५ चे सी.बी.डी.टी. परिपत्रकाप्रमाणे सहकारी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्थाना देखील त्यांचे व्यवसायाचे दृष्टीने केलेली गुंतवणूक व त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न “ Profit and Grains of Business and Profession” गृहीत धरल्या जाते .मात्र तरीही सुद्धा पतसंस्था वेठीस धरल्या जात आहे आणि त्यांचे वर आयकर आकारणी करून अडचणीत आणल्या जात आहे.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आयकर विभागातर्फे हा आयकर त्वरित भरणा करण्याचे आदेश सुद्धा निर्गमित केल्या गेलेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन व सहकार भारती च्या शिष्ट मंडळाने नवी दिल्ली दि .१६ डिसे.२०१९ रोजी येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.अनुराग ठाकूर यांची नार्थ ब्लॉक येथील वित्त मंत्रालयाच्या सचिवालयात भेट घेवून त्यांना निवेदन दिलीत. त्याप्रसंगी श्री.ठाकूर यांनी आपले सचिवांना बोलावून या संदर्भात त्वरीत लक्ष देण्याचे निर्देश दिलेत.

याच बाबीचा पाठ पुरावा करण्यासाठी आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते यांचे उपस्थितीत सी.ए.आशिष मुकीम, सी.ए.एस.यु.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र घाटे, उपाध्यक्ष – रवींद्र सातपुते, किरण रोकडे, विलास लेंडे यांनी स्मुती मंदिर रेशीमबाग, नागपूर येथे भेट घेतली. या संदर्भात पुन्हा १८ जानेवारी रोजी आयकर व जी.एस.टी. संदर्भात नागपूर येथे सबंधित उच्च अधिकाऱ्यांची बैठक स्वत: त्यांचे उपस्थितीत घेण्यात येत असल्याची ग्वाही मंत्री महोदयांनी दिली.

Advertisement
Advertisement