Published On : Mon, Apr 5th, 2021

गिरोला स्मशानभूमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

भंडारा :- कोरोनामुळे निधन झालेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार करण्यात येणाऱ्या भंडारा येथील गिरोला स्मशानभूमीची जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित होते.

भंडारा येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांवर नगर पालिकेच्या सहाय्याने अग्नी संस्कार करण्यात येतात. अत्यंत जोखमीचे असे हे काम नगरपालीकेचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून करतात.

आपला जीव धोक्यात घालून हे काम केल्या जाते अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी यावेळी दिली. कोरोना रुग्णांच्या अंत्य संस्कारासंबधी येणाऱ्या अडचणी व समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जाणून घेतल्या.