नागपुर : – महानगर पालिका नागपुर दूर्गा नगर शाळेमध्ये वही शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला वसुंधरा प्रतिष्ठान नागपुर तसेच विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ याच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजुना होतकरू विद्यार्थाना मदत म्हणून सदर कार्यक्रम वसुंधरा प्रतिष्ठान नागपुर प्रमुख समिर काळे (शिक्षक) याच्या पुढाकराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
समाजातील बहुसंख्य गरीब व गरजू होतकरू विद्यार्थाना शिक्षणाची गोड़ी निर्माण होवून शिक्षणाची ओढ़ लागावी जेणेकरून हें विद्यार्थी भविष्यात चागले नागरिक बनु शकतील हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून वसुंधरा प्रतिष्ठान याच्या वतीने स्कूल बॅग व वह्या शालेय साहित्य वितरणाचा हा समाजाप्रयोगी कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच या कार्यकमाचे औचित्य साधुन यावेळी मुख्याध्यापिका सौ ठवरे मैडम याना वृक्ष भेट देण्यात आले वसुधरा प्रतिष्ठान ही गेल्या दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून यामधे गोरगरीब मुलांना गणवेश वाटप कपड़े वाटप झाड़े लावने बाबत जनजागृती होतकरू विद्यार्थाना मदत करीत आली आहें यांच्याच एक भाग म्हणून विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला .
तसेच मिलिंद वानखेड़े सर व वसुधंरा प्रतिष्ठान नागपुर प्रमुख विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ शहर संघटक समिर काळे यांनी वसुधंरा प्रतिष्ठान नागपुर मध्ये कशा प्रकारे काम करते आणि प्रतिष्ठान चे ध्येय धोरण व उद्दिष्टय याविषयी माहिती दिली यावेळी शाळेतील गरीब गरजुना होतकरू विद्यार्थाना उपस्तित मान्यवर तसेच नगरसेविका सभापती सौ रुपाली ताई ठाकुर, नगरसेविका सौ कल्पना ताई कुंभलकर, समाजसेवक परशु भाऊ ठाकुर, शिक्षण मंडळ चे माजी संदस्य शिक्षक नेते मिलिंद वानखेड़े सर, समाजसेवक ए. टी. खोब्रागडे सर, समाजसेवक रोहित दादा माड़ेवार, संजय धरममाळी सर, समाजसेविका अर्चना ताई नासरे, शुभम राउत, डोईफोड़े सर, गडकरी सर, याच्या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

