Published On : Tue, Jul 30th, 2019

नगरधन मध्ये कामगारांना सुरक्षा किटचे केले वितरण

रामटेक : महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर व अन्य मजदूर कल्याणकारी मंडळाच्या विदयमाने रामटेक व मौदा तहसील अंतर्गत नगरधन व चाचेर जिल्हा परिषद सर्कल इमारत निर्माण मजुरांना 1200 सुरक्षा किटचे वितरण रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी मलिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते नगरधन येथे वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा मौदा अध्यक्ष कैलास बरबटे, समाजसेवक आनंद रामेलवार, योगेश कुरडकार ,भुणेश्वर बिरणवार प्रशांत डोकरिमारे ,विनोद बावनकुडे, देवेंद्र कोंगे,रवी देशमुख व प्रीतमसिंग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते . सुरक्षा किट वितरण प्रसंगी विचार व्यक्त करताना आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले की,” काम कोणत्याही क्षेत्रातील असो ते करणाऱ्या व्यक्तिला सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ,मजुरांना ,स्त्री-पुरुषांना गरजेच्या व कामात पडणाऱ्या वस्तू वेळीच मिळाल्या तर ते अधिक चांगले काम करू शकतात.आणि शासनाच्या योजनेतून सुरक्षा किट दिली जात आहे तिचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात बांधकाम मजुरांनी आणि कामगारांनी घ्यावा.

शासन वेळोवेळी आपणास भरघोस मदत करीत आहे आणि भविष्यातही ती करणार आहे आणि आपणही बांधकाम क्षेत्रात काम करतांना उच्च प्रतीचे काम करीत राहावे तसेच तुम्हाला जेवढया जास्त प्रमाणात उपलब्ध करून देता येईल त्या सर्व पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.,” यावेळी रामटेक व मौदा तहसिल मधील हातोडी, आजनी ,लोहडोंगरी ,हमलापुरी ,नंदापुरी ,चाचेर ,नेरला ,दुधाला ,बारसी, वडेगाव ,बनपुरी, कचुरवाही व इतर गावातील लाभार्त्यांनी या योजनेचा लाभ घेतला.यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम क्षेत्रातील कामगार,मजूर उपस्थित होते.आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी हया योजनेचा लाभ लाभार्थ्यांना पुरेपूर मिळावा या करीता आनंद रामेलवार यांनी हया शिबिराचे यशस्वीरित्या केलेल्या आयोजन बद्दल त्यांचे कौतुक केले . यावेळी समाजसेवक आनंद रामेलवार यांनी प्रस्ताविक व संचालन योगेश कुरडकार यांनी आभार मानले.