Published On : Sat, Aug 24th, 2019

महानिर्मिती नाटय स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Advertisement

चंद्रपूर प्रथम,परळी द्वितीय,मुंबई तृतीय.

नागपुर : महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाटयस्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण सोहळा २३ ऑगस्ट २०१९ रोजी महाकवि कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाला.या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान संचालक(संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे यांनी भूषविले तर मुख्य आकर्षण आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते श्री. सयाजी शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी मंचावर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.पुरुषोत्तम वारजूरकर, सांघिक नियोजन व सुसंवादचे कार्यकारी संचालक श्री.सतीश चवरे, प्रकल्प मुख्य अभियंता श्री.विठ्ठल खटारे, जल विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री.राजेश मोराळे, आयोजन समिती अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री.उमाकांत निखारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.अनिल मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्पर्धेला श्री. चंद्रकांत जोशी, मानसी मागीकर, श्री.मंगेश बनसोड हे परिक्षक म्हणुन लाभले. या प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते श्री.सयाजी शिंदे म्हणाले कि, सफाई कामगारांचा केलेला सत्कार त्यांना भावला, आनंद द्यावा व घ्यावा हाच जगण्याचा खरा मंत्र आहे व नाटक हि साधना असून त्यासाठी सतत मेहनत, वाचन करावे असे त्यांनी सांगितले. झाडे आपल्याला जगवतात, त्यामुळे सर्वांनी झाडे लावलीच पाहिजे असेही सांगितले. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची प्रशंसा केली व जाताना काळा पेरू व पांढरा जाभूळ हि झाडे नेतांना आनंद होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्य अभियंता श्री.उमाकांत निखारे यांनी सर्वांचे स्वागत केले सर्व संघाचे व मुख्य कार्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच सुरवातीला कालीदास कलामंदिर व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या नाट्यस्पर्धेमुळे महानिर्मितीचे विजेते संघ राज्य व कामगार नाटय स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊ शकतील असे सांगितले व त्याबद्दल मुख्यालयाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल मुसळे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी केले. या नाटय स्पर्धा अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडल्या.

याप्रसंगी बोलताना परीक्षक श्री.चंद्रकांत जोशी यांनी नाटक हे मनातील कचरा दूर करते, आंतरिक उर्जा देते असे आपल्या मनोगतात सांगितले.

याप्रसंगी बोलताना श्री.चंद्रकांत थोटवे यांनी वैतरणा केंद्राच्या बिकट परिस्थितीशी हिम्मतीने तोंड दिल्या बद्दल टीम वैतरणाचे कौतुक केले. कलावंताच्या पाठीशी महानिर्मिती राहील, नाटकातील उर्जा घेऊन ऑक्टोबर मधील वीज निर्मितीच्या आव्हानाला तयार राहावे असे त्यांनी प्रकर्षाने नमुद केले. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या नाटकाचे प्रयोग सर्व वीज निर्मिती केंद्रात महानिर्मितीच्या खर्चाने दाखविण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केली.

या प्रसंगी निवृत्त होणाऱ्या नाट्य कलावंत कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. निवृत्त होणाऱ्या कलावंतानी महानिर्मितीच्या नाट्य स्पर्धेचा गौरवशाली इतिहास सांगितला आणि या नाट्य स्पर्धेतून अनेक नविन कलावंत रंगभूमीला मिळाले या बद्दल समाधान व्यक्त केले.

हया नाटय स्पर्धेसाठी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारीवृंद, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, पत्रकार बांधव, सर्व कल्याण अधिकारी, संघव्यवस्थापक, वीज केंद्रातील संघटना पदाधिकारी, एकलहरे वसाहत वासिय, व नाशिकमधील अनेक नाटय रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

ह्या नाट्य स्पर्धेला उप मुख्य अभिंयता श्री.मोहन आव्हाड, श्री.राकेश कमटमकर, अधिक्षक अभियंता श्री.शंशाक चव्हाण, श्री.मनोहर तायडे, यांचे मार्गदर्शन लाभले तर या वेळी श्री.अतुल सोनजे, श्री.अभिजित आहेर, श्री.एस. वाय.चौधरी, श्री.समीर देऊळकर, श्री.प्रशांत लोटके, श्री.प्रताप शिंदे, श्री.संदीप कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.लिना पाटिल व सौ. वांसती नाईक यांनी खुमासदार पध्दतीने केले. कल्याण अधिकारी श्री.निवृती कोंडावले यांनी सर्वांचे आभार मानले.

नाटय महोत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वश्री.प्रविण काळोखे, निवृती कोंडावले, वैशाली धोंडगे, विजय रावळ, किरण खैरे, मंगेश आवारी,नितिन मोरे, राजेश काळे, जयश्री गोरे, सुनिल सुळेकर, विक्रांत किंबहुणे, अशोक देवडे, गुलाब पवार, अनिल साळवे, सृन्जल हिरे, कुसुम आचारे, अश्विनी आहेर यानी विशेष परिश्रम घेतले.

नाट्यस्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

नाट्य निर्मिती चंद्रपूर औ. वि. केंद्राचे ‘’ काय डेंजर वारा सुटलाय ” प्रथम, परळी औ. वि. केंद्राचे “ नजरकैद ” द्वितीय, मुंबई मुख्यालयाचे “प्रकरण पहिले” तृतीय.

दिग्दर्शन प्रथम – निलेश मुळे परळी द्वितीय – बद्री कायंदे चंद्रपूर, तृतीय – चंद्रकांत जाडकर नाशिक

पुरुष अभिनय प्रथम – शशांक गाढवे चंद्रपूर द्वितीय – मिलिंद चन्ने परळी तृतीय – हेमंत सरोदे मुंबई

स्री अभिनय प्रथम – प्राची दाणी खापरखेडा द्वितीय – सायली देठे chandrapur तृतीय अंजली कुलकर्णी मुंबई

लक्षवेधी अभिनय पुरुष – प्रवीण मोरे नाशिक
लक्षवेधी अभिनय स्री – सुनली डोंगरे परळी

नेपथ्य प्रथम – प्रफुल्ल कुलकर्णी मुंबई द्वितीय – दिन्ग्म्बर इंगळे चंद्रपूर तृतीय – प्रसाद निर्मले परळी

प्रकाशयोजना प्रथम – धीरज सातपुते परळी द्वितीय – विष्णू पगारे चंद्रपूर तृतीय – विजय रावळ

पार्श्वसंगीत प्रथम – नितीन जोगळेकर मुंबई द्वितीय – धीरज कासेरवाळ परळी तृतीय अजित मोटे पोफळी

रंगभूषा वेशभूषा प्रथम – झलकारी कोरडी द्वितीय – ज्योती चंद्रमोरे नाशिक तृतीय – मंगेश डोंगरे पोफळी

उत्तेजनार्थ अभिनय – निलेश राऊत नाशिक , संकेत पगारे चंद्रपूर, ओवी ढवळे कोरडी भास्कर शेगोकार खापरखेडा, विश्वास कांबळे पोफळी, नितिन देवरे भुसावळ, सुनली डोंगरे परळी, अपर्णा इंगळे पारस.

बालकलाकार – अनुशका कदम, आर्यन क्षिरसागर, मनस्वी वळंजू , श्रेया, स्वारीत, कुशाल, हिमांशू, चेतना, कावेरी