Published On : Tue, Apr 21st, 2020

माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या वतीने पोलिसांना पी पी ई किट चे वितरण

कामठी :-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा भारतासह महाराष्ट्रात सुदधा पोहोचला आहे या पाश्वरभूमीवर कामठीत लॉकडाऊन सह संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.

तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी निरर्थक बाहेर पडू नये असा संदेश देत आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसुल प्रशासन कोरोनाच्या लढाईत योद्धाची भूमिका साकारत आहेत त्यात विशेषतः पोलीस तसेच आरोग्य विभाग जीवाचे रान करीत आहेत तसेच पोलीस वर्ग सद्रक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रीद वाक्यासह डोळ्यात तेल घालून 24 तास गस्त घालूंन नागरिकांना सेवा पुरवीत आहेत .

कोरोना विषाणू हा संसर्गातून येत असल्याने या परिस्थितीत पोलिसांची आरोग्य सुरक्षितता लक्ष्यात घेत कुठलेही पोलीस या कोरोना विषाणू ला बळी पडू नये या मुख्य उद्देशाने कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभ हस्ते कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीपीई किट चे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल चामले, नगरसेवक काशीनाथ प्रधान आदी उपस्थित होते.